वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

You are currently viewing वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आज आपला वाढदिवस, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा text

आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं ! भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम ! जन्मादिवसस्य शुभाशय: ! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

also read:-

Birthday Wishes For Daughter In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मैत्रीण

नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply